काजवा

रात्रीच्या गर्द अंधारात, एकटाच स्वछंद मनाने फिरणारा आणि क्षणिक आयुष्य सुखाने जगणारा....तो एकमेव






बोम्मारिल्लू



काल एक ब्लॉग वाचताना ह्या सिनेमाचा उल्लेखा मध्येचा आला आणि काही टाइंपयास नव्हता म्हणून माझ्या अण्णा (साउत इंडियन हो) मित्राला विचारले की बाबा हा पिक्चर कसा असावा .

तर तो म्हणाला मी बघितला नाही पण लोक म्हणतात चांगला पिक्चर आहे .

मी ठरवले की बघून बघुया ...कसा आहे तो ते .... म्हणून मग गूगले वर गेलो आणि youtube सर्च केले.

आत्ता पिक्चर तर अण्णा ...मग मला त्यातले काही कळणार नाही म्हणून मग इंग्लीश सबटाइटल असलेला सीक्वेन्स सेलेक्ट केला.
सिनेमाची सुरूवात फार सुंदर आहे ... लहान मुलगा वाळूत चालत असतो ...त्याचे बाबा त्याला आधार देण्यासाठी आणि त्याचे पहिले पाउल नीट पडण्यासाठी मदत करत असतात .
पण हे पहिले पाउल किती ठिकाणी आणि किती वेळा त्यांनी सावरावे ह्याला प्रत्येक बाबांनी ठरवायला हवे आणि मुलाला कसे वाढवावे हे फार सुंदर रित्या सांगितले आहे .

सिनेमाचा नायक सिद्धार्थ ....सिदूच्या भूमिकेत शिरून इतक्या बारकाईने वयात आलेल्या मुलाची अवस्था इतक्या सुंदररित्या साकारून दाखवतो की ते खारोखार समोर घडत असावे आणि आपण त्यांच्यातल्या पैकी एक आहोत असे भासावे .


सिद्धू मूळचा सुखवस्तू घरातला आणि एकत्र कुटुंबातला ..... एकत्र कुटुंब म्हणजे हल्ली जे मुंबईत वाढते तसे ... आजी आजोबांचे नाही .... आणि नायिकेच्या भूमिकेत आहे गेनेलिना ( हसिनी म्हणून.... हो तीच जाणे तू या जेणे ना मधली नायिका .....अहो नाही आठवली ....... मुलाला विचारा की पापू कॅन नॉट डॅन्स साला जरा सर्च करून दे )



सगळा पिक्चर फिरतो ते घरचा मुख्य करतापुरूष आणि वडील या नात्याने बाबांनी मुलांसाठी घेतलेले कष्ट आणि मुलांची काळजी करता करता त्या मुलांवर घातलेली बंधने ह्या भोवती. मुलगा वायताता आला की किंवा वाढताना ही त्याला त्याची एक चोइस असावी आणि ती त्या मुलाच्या बापणे जपावी हीच एक अपेक्षा आहे सिनेमाची ...जर ती जपली नाही तर कसे होते ते ह्या पिक्चर मध्ये सुंदररित्या मांडले आहे .

नायिकेचा नायकाच्या जीवनात प्रवेश झल्यावर त्याला ते प्रकर्षाने जाणवते आणि मग त्याची झॅलेली घुसमट .... हे आहे बोम्मारिल्लू.
बोम्मारिल्लू चा तेलुगू मध्ये अर्थ आहे की स्वप्नतले घर किंवा इंग्लीश मध्ये सांगायचे तर टॉय हाउस ...असे घर की जे आपण स्वप्नात पहावे आणि ते सत्यत उतरायचा प्रयातना करावा.

पिक्चर बद्दल अजुन सांगत नाही कारण की सिनेमाचा गाभा सांगितला तर पिक्चर बघण्याची उत्कताता निघून जाईल .... तसा मी देखील हा पिक्चर फार उशिरा पहीला असे महनावे लागेल ...कारण पिकुत्रे रिलीस झला आहे २००६ साली आणि मी बघत आहे २००९ च्या डिसेंबर महिन्यात ......म्हणजे मी तब्बल 3 वर्ष साधारण पाठीमागे आहे ...

असो कधीही ना बघण्यापेक्षा एक बरे आहे की बघून झले आणि नंतर अजुन उशीर झला असे म्हणायला नको ....

तुम्हीही बघा आणि जर का ह्या ब्लॉग ने तो बघून तुमचा वेळ सफल झला असे वाटले तर मग मला आभरची नोंद ठेवा म्हणजे तुमच्या साठी अजुन काही पिक्चरचे विश्लेषण( जास्त मराठी झले नाही .....एक डम जड असे .... सोप्या मराठीत त्याला रिव्यू म्हणतात) लिहीत जाईन ..



"अग्गोबाई-ढग्गोबाई" या अल्बममधल्या "दूर देशी गेला बाबा" या स्वतःच्याच गाण्याला उत्तर म्हणून वडीलांच्याभूमिकेतून "दमलेल्या बापाची ही कहाणी तुला" हे गाणं संदीपनी नुकतंच लिहीलेलं आहे. "आयुष्यावर बोलू काही" च्या५०० व्या भागात संदीप-सलीलनी हे गाणं पहिल्यांदा सादर केलं:


* (सलीलचा आवाज) पद्य:
* कोमेजून निजलेली एक परी राणी
* उतरले तोंड,डोळा सुकलेले पाणी
* रोजचेच आहे सारे काही आज नाही
* माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
* झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
* निजेतच तरी पण येशील खुशीत
* सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
* दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
* ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
.....................................................................
* आटपाट नगरात गर्दी होती भारी
* घामाघूम राजा तरी लोकलची वारी
* रोज सकाळीच राजा निघताना बोले
* गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
* जमलेच नाही काल येणे मला जरी
* आज परि येणार मी वेळेतच घरी
* स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी
* खर्‍याखुर्‍या परीसाठी गोष्टीतली परी
* मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
* दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
* ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
....................................................................
* (संदीपचा आवाज) गद्य:
* ऑफिसात उशीरा मी असतो बसून
* भंडावले डोके गेले कामात बुडून
* तास-तास जातो खाल मानेने निघून
* एक-एक दिवा जातो हळूच विझून
* अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
* आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
* वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
* तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
* उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
* चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी
.....................................................................
* (सलीलचा आवाज) पद्य:
* उधळत खिदळत बोलशील काही
* बघताना भान मला उरणार नाही
* हसूनिया उगाचच ओरडेल काही
* दुरूनच आपल्याला बघणारी आई
* तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
* क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
* सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
* दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
........................................
* (संदीपचा आवाज) गद्य:
* दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
* मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
* गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
* सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी
.....................................................................
* (सलीलचा आवाज) पद्य:
* कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
* सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
* जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला
* आईपरी वेणी फणी करतो ना तुला
* तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
* तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
* सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
* दमलेल्या बापाची या कहाणी तुला....
* ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
....................................................................

* (संदीपचा आवाज) गद्य:
* बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
* आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
* आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
* रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
* लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
* दूरचं पहात राहिलो फक्‍त,जवळ पहायचंच राहिलं
.....................................................................
* (सलीलचा आवाज) पद्य:
* असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
* हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
* असा कसा बाबा देव लेकराला देतो
* लवकर जातो आणि उशीरानं येतो
* बालपण गेले तुझे-तुझे निसटून
* उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
* जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
* नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
* तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
* मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
* सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
* बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
* ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....