काजवा

रात्रीच्या गर्द अंधारात, एकटाच स्वछंद मनाने फिरणारा आणि क्षणिक आयुष्य सुखाने जगणारा....तो एकमेव

Greeting हे झाले आज कालच्या तरुण मुलांच्या भाषेत परंतु मराठीत शिकलेल्या आणि मराठीवर प्रेम असलेल्या तरुणाच्या भाषेत सांगायचे तर "अभिवादन" थोडा जड आहे पण काय करणार भाषाच तशी प्रगल्भ . असो तर विषय असा कि अभिवादन .

वेळ :- शनिवार सकाळ साधारण ९ ते १० च्या दरम्यानची
स्थळ :- कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

मी माझ्या घराच्या बाल्कनी मध्ये नेहमीपेक्षा निराळा( निराळा अश्या साठी म्हणालो कारण या वेळेला मी सहसा जागाच नसतो , कारण आपली शनिवारची पहाट होतेच मुळी १०.३० ला आणि त्यात आणखी भर म्हणजे मीच तयार करून घेतलेला चहा ) , चहा घेत बसलो होतो . आजची पहाट जरा निराळी होती , पहाट निराळीच असते पण तिचा आनंद घ्यायला मी लवकर उठत नसतो .एका बाजूला हातात चहा डिशमध्ये "Parle-G" ( हो मी अजून सुधा Parle-G ची बिस्किट आणि ते सुधा अमेरिकेत तितक्याच आवडीने जसा लहानपाणी बाबांनी आणल्यावर खाण्यात मज्जा घेऊन खायचो तसाच आजदेखील खातो .) आणि बाजूला laptopवर "अजनबी मुझको इतना बता ( प्यार तो होना हि था ) " ऐकत बसलो होतो .
माझ्या बाल्कनीच्या समोर मोठे lawn (भुईसपाट कापलेल्या गवताचे पटांगण) आहे , तिथे एक कुटुंब फिरताना दिसले . कुटुंब म्हणजे बाबा आणि त्यांच्या २ छोट्या मुली . अमेरिकन कुटुंब होते . आई जवळपास दिसत नव्हती कदचीत गाडीत असावी अमेरिका आहे जास्त खोलात न जाणेच बरे नाही का .छोटी मुलगी साधारण ४ ते ६ वर्षांची असावी आणि मोठी ६ ते ८ वर्षांची असावी . मुली गवतात खेळण्यात मग्न होत्या आणि बाबात्यांचे video शूटिंग करण्यात.
मला थोडे आश्चर्य वाटले लहान मुले गवतात खेळणे हे काही विशेष नाही .बाल्कनीतून बघण्यात निराळाच आनंद येत होता .जिज्ञासा निर्माण झाली कि बाबा मुलींचे शूटिंग का करत असावेत. जाणून घेण्याच्या इच्छेने मी चहा संपवली आणि खाली गेलो . अमेरिकेत तुम्ही अनोळखी असलात तरी समोरची व्यक्ती तुम्हाला अभिवादन नक्की करते , आत्ता ८ -१० महिने इथे राहिल्या नंतर हे माझ्या लक्षात आले होते . हाच माझा एकमेव मार्ग त्या व्यक्तीशी (बाबांशी) संपर्क साधण्याचा .
मी खाली जाईपर्यंत साधारण २० ते २५ मिनट झाली असावीत , थोडा मुद्दाम उशीर केला मला त्या व्यक्तीच्या शूटिंग मध्ये व्यत्यय आणायचं नव्हता , पण चिकित्सा काही जात नव्हती . हो नाही करता करता केली हिम्मत आणि खाली गेलो . त्या व्यक्तीला "शुभ प्रभात" म्हणालो . ( हा हा हा हसायला आले न अमेरिकेत शुभ प्रभात म्हणत आहे म्हणून , मी देखील त्या व्यक्तीला Good morning असेच म्हणालो ). त्या व्यक्तीने देखील मला Good morning असे अभिवादन केले. मी म्हणालो " nice warm Saturday morning right sir ? " , ती व्यक्तीदेखील म्हणाली "yes sir , after long time a warm Saturday morning ".
मी त्या व्यक्तीला म्हणालो ," i stay in that house , (माझ्या घराच्या दिशेने बोट करत) . from past ३० minutes was enjoying the weather and watching that you were shooting your daughters. was curious about it " .ती व्यक्ती म्हणाली "yup sir , i get very less time to enjoy with my family as i work in a firm , whole week I will be busy in my routine office life . so today i purposefully came with my family here to spend some time with my daughters and wife ". मग मी एक स्मित हास्य केले ( मनात म्हणालो मी देखील असाच घाणीच्या बैलासारखा असतो रे बाबा , पूर्ण आठवडा आपल्याच धुंदीत आणि कामात ). मी जिज्ञासा म्हणून म्हणालो," was wondering , you was doing video shooting ". ( मी फोटो शूट करणारा व्यक्ती आहे, मला video शूटिंग पेक्षा फोटो शूटिंग ला मज्जा येते )ती व्यक्ती( john , आत्ता पर्यंत नावाची ओळख झाली होती ) म्हणाली," yes , as i said i get very less time that also in the very nice and warm morning . when my daughters will grow up or during the time when I will be in my house with my daughters will watch these videos and will show them as well how we spend good time and how they were looking at the time when they were child ".


तेवढ्यात त्याची बायको तिथे आली , तीला देखील मी अभिवादन केले आणि काढता पाय घेतला.त्याला आणि त्याच्या बायकोला " have a gr8 day ahead and happy weekend to you " आणि स्मित हास्य करून निघालो .

अमेरिकेत एक गोष्ट प्रामुख्याने मला जाणवली ती म्हणजे माणसाची privacy (एकांत ) . अमेरिकेत privacy ला फार महत्व आहे तुम्ही कोणाची privacy मोडू शकत नाही .मला त्या माणसाचे विचार फार पटले आपल्या आयुष्याच्या चांगल्या क्षणांना उपभोगण्या बरोबर त्याने ते कॅमेराच्या मदतीने बंदिस्त केले होते . पुढे जेंव्हा कधी तो ती चित्रफित (picutre /video ) आपल्या फमिली बरोबर बघेल तेंव्हा तो आनंदात असेल.

सुरुवातीच्या काळात जेंव्हा अमेरिकेत आलो होतो , तेंव्हा अनोळखी व्यक्ती आपल्याला अभिवादन करते आहे हे थोडे चमत्कारिक वाटे . त्यात एखाद्या सुंदर ( आणि ते पण अमेरिकन ) तरुणीने म्हणावे मग तर काय दिवसच आनंदात गेला . तेंव्हा विचार करायचो आपण अनोळखी सोडाच पण ओळखीच्या किती मुलीना "शुभ प्रभात " असे म्हणायचो , आठवतच नाही म्हणा .मला आठवते त्या प्रमाणे मी हे असे अभिवादन माझ्या इंजीनियरिंगच्या वर्गात प्रथम केले , ते देखील मित्र मला म्हणाला तेंव्हा .

आत्ता तुम्ही म्हणत असाल कि लेखाचे नाव अभिवादन का दिले , तर ते अशासाठी कि अभिवादन ह्या एकमेव दुव्याने मला त्या व्यक्तीशी (John )शी संपर्क करता आला आणि कुतूहल/जिज्ञासा पूर्ण झाली .असो आत्ता वेळ आली आहे शाहरुख खानच्या त्या जुन्या गाण्य्ची , हो हो तेच राजू बन गया gentleman मधले "दिल है मेरा दिवाना , यारो मैं तो चला "