काजवा

रात्रीच्या गर्द अंधारात, एकटाच स्वछंद मनाने फिरणारा आणि क्षणिक आयुष्य सुखाने जगणारा....तो एकमेव

आठवड्याभरा पूर्वी  मी  "UP IN THE AIR" हा इंग्लिश चित्रपट बघितला.चित्रपटाची संकल्पना  एक दम मस्त आहे . सध्याच्या कॉर्पोरेट जगातील आपले जीवन ह्याची एक उत्तम निर्मिती आहे .

चित्रपटाचा नायक (माफ करा मी तितका इंग्लीश चित्रपटांचा चाहता (FAN ) नसल्यामुळे मला चित्रपटाच्या कॅरक्टची खरी किंवा पिक्चर मधली नावेदेखील माहीत नाहीत) एक साधारण मध्यम वयस्कर व्यक्ती दाखवलेला आहे 40शी दरम्यानची.
आज कालच्या कॉर्पोरेट जगात जे चालते त्याचा तो एक उत्तम प्रतिनिधी ठरतो, "गरज सरो वैद्या मारो" ह्या म्हणी प्रमाणे त्याचे काम एकच लोकांना कमी करणे . तो कारखान्याच्या (companychya ) निरनिराळ्या कार्यालयांना(ऑफिससला) भेट देऊन फक्त लोकांना स्वेच्छानुवृत्ती (वॉलंटरी रिटाइयर्मेंट) स्वीकारा हाच संदेश देतो रॅदर त्यांना हातात फॉर्म देऊन त्यावर ताबडतोब अमल बजावाणी करायला सांगतो, तो एका मॅनेजर आणि फ्रीलॅन्स लेक्चरर च्या रूपात दाखवला आहे.


कॉर्पोरेट जागाप्रमाणेच त्याची एक प्रेयसी असते , आज काल लोकांची असते तशीच फक्त एकमेकांच्या  करमणुकीसाठी. जीवनातील आनंद लुटण्यासाठी असे म्हणा हवे तर.
एक दिवस बहीनीचे लग्न ठरले आहे असे त्याला कळते , लग्नाच्या दिवशी बहीनीचा होणारा नवरा नकार देतो आणि म्हणतो की काय उपयोग आहे लग्न करून का अडकून राहायचे ह्या बंधनात.
तेंव्हा त्याची आईई(नक्की माहीत नाही आई किंवा कोण ते)  त्याला (नायकला) सांगते आज तुझी गरज आहे ह्या घराला बहीनीचे तुटणारे घर वाचाव , बहीनीच्या भावी नवर्याला समजाव आणि लग्नास तयार कर. तो हुशार व्यक्ती असल्यामुळे तो त्याचे मन परावृत्ता करतो आणि भहिनीचे मोठ्या दिमाखात लग्न होते . लग्नात समारभात त्याच्या सोबत असते ह्याची ( नायकाची) तीच प्रेयसी .
तो हे लग्नकार्य उरकून पुन्हा निघतो आपल्या ठरलेल्या कामावर , कामावर जाताना त्याला बहीनीच्या लग्नातले प्रसंग आठवतात , एके दिवशी अचानक एका सेमिनार अर्धवट टाकून निघून जातो, तो त्या सेमीनारचा वक्ता असतो.
कारण असे असते की त्याला आत्ता कुटुंब ह्याची खरी जाणीव झालेली असते , तो त्या प्रेयासीच्या माहीत असलेल्या पत्यावर जातो आणि त्याला खरे काय ते कळते .
आज कालचे खरे कॉर्पोरेट आयुष्या काय असते आणि काय चालू आहे ह्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे . नायकला खरे काय कळते हे मी संगण्यापेक्षा पहिले तर फार उत्तम ठरेल आणि त्यातून आपण काही बोधा घेतला तर निर्मात्यची जी संकल्पना आहे आणि ज्या करणासाठी ती निर्मिती केली आहे त्याचा मोटो( मॉडर्न मराठीत त्याला उद्देश किंवा ध्येया म्हणता येईल) सफल होईल.

माझया भाषेत थोडक्यात सांगायचे तर ते असे असेल:-
माणूस हा एक गाढव प्राणी आहे, एका नदीत उभा असलेला . त्याचा प्रवास सुरू होतो नदीच्या एका तीरवरून आणि जायचे असते नदीच्या दुसर्या तीरावर. त्या गाढवावर असते एक साखरेचे पोते .साखरेच्या पोत्याला आपण त्या माणसाच्या आयुष्यातल्या त्याच्यावर असलेल्या अपेक्षा म्हणू. सामाजिक किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकंकडून किंवा त्याच्या स्वतःच्या. जर का तो ती नदी ओलांडताना थांबला किंवा थकला आणि त्याने थोडी विश्रांती घ्यायचा विचार केला तर त्याला त्याची परवानगी नाही.
कारण नदीच्या पात्रात (पाण्यात) तुम्ही (गाढव) मध्येच बसला तर साखर विरघाळून नदीत मिसळून जाणार, त्यामुळे  नदीचे पैलतीर  गाठल्याशिवाय त्याने मध्ये थांबायचे नाही.थोडक्यात काय, माणसाने आपल्या व्यक्‍तिगत/कौटुंबिक जीवनाला(Personal Life) सगळ्यात महत्व द्यावे कारण ते त्याच्या सोबत आयुष्यभर राहते, त्याचे व्यावसाईक जीवन(Professional Life) हे आज आहे तर उद्या नसेल किंवा ते बदलेल पण त्याच्या सोबत त्याच्या सुख दुखच्या काळात त्याच्या सोबत असतात ते त्याचे कौटुंबिक जीवनातील सोबती आणि मित्र.

विशेल्षण  कसे वाटले हे जरूर कळवा  ,म्हणजे पुढचे विशेल्षण आणि त्याचा थोडक्यात सार लिहिण्यास आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला सुधारण्यात फार मोठी मदत होईल.
भेटूच पुन्हा अश्याच एका नवीन विषयासह माहीत नाही केंव्हा आणि कधी , पण भेटूच ह्या आशेवर

आशेवर राहण्यात किंवा वाट पाहण्यात काही मजाच निराळी आहे नाही का ???